लोगो डिझायनर कडून logo तयार करून घेत आहात ?

नवीन #logo करायचा असेल तर पुढील गोष्टी लक्षात घ्या म्हणजे नंतर तुम्हाला ग्राफिक लोगो डिझायनर शी बोलणे सोपे जाईल.

  1. logo / चिन्ह तयार करताना हा विचार असावा की तो कोणत्याही माध्यमांमध्ये सहज व एक सारखा उतरवता आला पाहिजे. मग मुद्रण [print] असो वा चित्रण [graphic]. या बाबत विचार करताना मोबाईल पासून फ्लेक्स पर्यंत सगळे पर्याय पडताळून पहिले पाहिजेत. logo सर्व माध्यमात एकसारखा दिसणे महत्वाचं . लोगो तयार करताना नेहमी तो काळ्या / करड्या पण एकच रंगात करावा. अगदीच दोन भाग पडत असतील तर त्यातल्या त्यात ग्रे शेड्समधेच तो बनवला म्हणजे तो कोणत्याही इतर रंगसंगतीत उतरवता येतो आणि नंतर रंगाचे बंधन राहत नाही. लोगो डिझायनर ने ह्या दृष्टीने विचार केला आहे का हे तपासा, त्याला तसे करायला सांगा.
  2. logo किमान १ स्क्वे. इंच ते कमाल आकारात सहज कमी जास्त करता आला पाहिजे व तसाच ओळखता ही आला पाहिजे. कमी आकारातला लोगो मोठ्या आकारात जाताना त्यातील details वाढले तरी उत्तम पण कमी होताना त्याच मूळ प्रमाण [proportion, character] बदलता कामा नये.
  3. एक रंगापासून तयार केलेले चिन्ह खूपदा साधे वाटते पण बऱ्याच brands चे logo पहिले तर तो साधे पणाच नंतर ग्रेट वाटू लागतो .. उदा. Tata, Airtel, bajaj etc. या लोगोची ताकदच साधेपणात आहे. तेव्हा logo दिसायला साधा सरळ आहे अस म्हणण्यापेक्षा व्यक्त होत आहे ते महत्वाचं !
  4. logo ची संकल्पना हि त्या समविचारी व्यावसायी लोगोंपेक्षा वेगळी व उठून दिसणारी असावी. logo हि पुर्णत: जो लोगो बनवून वापरणारा आहे त्याची मालकी असते, त्या व्यक्तीच अथवा व्यवसायाच व्यक्तिमत्व लोगोतून उतरले तर तो उत्तम लोगो म्हणता येईल.
  5. थोडक्यात सांगायचं झालं तर लोगो साधा, समर्पक व व्यक्त होणारा असावा.

#logo तयार करताना त्याचा उद्देश तयार करून घेणाऱ्या व्यक्तीला स्पष्ट माहित असणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला लोगो designer कडून काय हवे आहे ते माहित होते आणि दोघांना सुसंवाद साधता येतो. नाही तर बरेचदा असे दिसून येते की लोगो कर्ता आणि करविता यात वाद होतात आणि काम ओम फस होते!!!

आमच्या ग्राहकांसाठी तयार केलेले असे काही लोगो.. 

Aksharmaitri – Swarmaitri – Learn Marathi Alphabets and Vowels with fun. ebizcard – new digital business card service from v-render studio Arbuza Website Developement ARAFinserv Website Developement Website Developement for Ex3DP

Website Developement for Ex3DP Aryavarta Beach Resort Aksharmaitri – Swarmaitri – Learn Marathi Alphabets and Vowels with fun.